
QS World University Ranking 2023 : IIT मुंबईचा डंका! अभियांत्रिकी शिक्षणात पटकवला देशात पहिला नंबर
QS World University Ranking 2023 : जागतीक विद्यापीठ क्रमवारी क्यूएस रँकिग नुकतीच जाहीर झाली असून 2023 च्या अभ्यासनिहाय जागतिक विद्यापीठ क्रमवारीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेने भारतात पहिला क्रमांक पटकवला आहे.
तर जागतिक स्तरावर आयआयटी मुंबई 47 व्या क्रमांकावर आहे. या रँकींगमध्ये संस्थेने 100 पैकी तब्बल 80.4 गुण मिळवले आहेत. बुधवारी ही रँकिंग जाहीर झाली असून एकूणच, या रँकिंगमध्ये संस्थेने 2022 च्या कामगिरीमध्ये 18 स्थानांनी सुधारणा केली आहे.
क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग ही विषयानुसार जारी केले आहे. या रँकिंगमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, नॅचरल सायन्स, सोशल सायन्स आणि मॅनेजमेंट आणि आर्ट आणि ह्युमॅनिटीस या पाच पैकी 4 विषयामंध्ये संस्थेला स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
विषयानुसार जारी झालेल्या या रँकिंगमध्ये 44 भारतीय प्रोग्राम्सनी जगातील टॉप 100 कोर्सेसमध्ये स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी त्याची संख्या 35 इतकी होती.
अभियांत्रिकीमध्ये, IIT बॉम्बे भारतात प्रथम आणि जगात 47 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, आयआयटी दिल्लीच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीने 48 वे स्थान मिळविले आहे.
याशिवाय आयआयटी बॉम्बेच्या मॅथ्सला 92 वा क्रमांक मिळाला आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 स्थानांनी वाढ झाली आहे. IIT कानपूरचा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग कोर्स आता जगातील 87 वा टॉप कोर्स आहे.तसेच येथील कंप्युटर सायंस आणि इनफॉर्मेशन सिस्टम 96 व्या स्थानावर आहे.
आयआयटी खरगपूर कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीमध्ये पुढे आहे. येथील सीएस आणि आयटी अभ्यासक्रमाला 94 वा क्रमांक मिळाला आहे. जो गतवर्षीच्या तुलनेत 15 स्थानांनी जास्त आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने समाजशास्त्रात 68 वा क्रमांक पटकावला आहे. तर दिल्ली विद्यापीठाला 91 क्रमांक मिळाला आहे.
क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँखिग ही जगातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित रँकिंग प्रणाली आहे. याद्वारे जगभरातूव विद्यापीठांचे मुल्यांकन केले जाते.दरम्यान या रँकिंगमध्ये आर्ट्स अँड डिझाईन, सिव्हिल अँड स्ट्रक्चरल इंजिनियरिंगसाठी आयआयटी मुंबईची क्रमवारी जागतीक पातळीवर 51 ते 100 च्या दरम्यान आहे.
कंप्युटर सायन्स अँड टेक्नोलॉजीसाठी संस्थेला 66, केमिकल इंजिनिअरिंगसाठी 77, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी 54, मेकॅनिकल इंजिनियरिंगसाठी 67 तर मिनरल्स अँड मायनिंगसाठी 37 वे स्थान मिळाले आहे.
एकूण क्युएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत, IIT बॉम्बे जागतिक स्तरावर 172 व्या क्रमांकावर आहे आणि इंडीयन इंस्टीट्युड ऑफ सायन्स, बंगलोर नंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे . 2022 मध्ये, IIT बॉम्बे एकंदर क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये जागतिक स्तरावर 177 व्या क्रमांकावर आणि भारतात प्रथम क्रमांकावर राहीले.