मुंबईतील क्वारंटाईन सेंटर म्हणजे जेलचं, किरीट सोमैया यांच्याकडून रुग्णांच्या गैरसोयीबाबत प्रश्न उपस्थित

kirit somaiya
kirit somaiya

मुंबई : कोरोना रुग्णांना ठेवण्यासाठी तयार केलेल्या मुंबईतील बारापेक्षा अधिक क्वारंटाईन सेंटर्सना भेट दिली असता तेथे स्वच्छतागृहांची दुरावस्था, पाण्याची अपुरी सोय, निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा पुरवठा होत असल्याचे आढळले. क्वारंनटाईन सेंटर ‘जेल’ वाटत असल्याची तक्रार रुग्णांनी केली, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी मंगळवारी दिली.

ते म्हणाले की, मुंबईतील क्वारंटाईन सेंटरची अवस्था ही तुरुंगापेक्षाही वाईट असल्याचे दिसून येत आहे. शहरातील क्वारंटाईन सेंटर्सना आपण प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याआधीही विविध क्वारंटाईन सेंटरमधील अस्वच्छता, गैरसोय या सर्व बाबी पुढे आल्या होत्या. त्या आपण संबंधितांच्या निदर्शनाला आणूनही काही सुधारणा झाली नाही. पण आता तर रुग्णांचे जेवणाचेही प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येत आहे. प्रति व्यक्ती 172 रुपये महापालिका ठेकेदाराला देत असूनही अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न कोरोना रुग्णांना मिळत असेल तर ते अत्यंत दुदैवी आहे. कोरोनावर औषध नसल्याने असे रुग्ण बरे होणे हे पूर्णपणे त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी रुग्णांना पोषक आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. तरीही जेवणाबाबत हेळसांड केली जाते हे धोकादायक आहे.

सोमैया म्हणाले की, मुंबईत पवईत हिरानंदानी येथील एमटीएनएल ट्रेनिंग सेंटरच्या मागे असलेल्या एमएमआरडीएच्या इमारतींमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. 22 मजली असलेल्या या इमारतींमध्ये 1650 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. काल या नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. या सेंटरमध्ये एस वार्डमधील विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, पवई या भागातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. याआधी क्वारंनटाईन सेंटरमध्ये खराब जेवण येत असल्याने सेंटरला जेवण पुरवणारा कंत्राटदार बदलण्यात आला होता. मात्र नवा कंत्राटदार असलेल्या महिला बचत गटाला पहिल्याच दिवशी जेवण देणे अपयशी ठरले त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांचे मात्र हाल झाले. अशा प्रकारे मुंबईतल्या जवळपास सर्वच क्वारंटाईन सेंटरची अवस्था ही अत्यंत वाईट असून, यामुळे रुग्णांना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. याला जबाबदार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Quarantine Center in Mumbai is a Jail for Patients, Kirit Somaiya raises questions about patient inconvenience

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com