Coronavirus : मुंबईत महाकाय विलगीकरण केंद्रे, हजारो खाटांची व्यवस्था

qurantine centre
qurantine centre

मुंबई : लॉकडाऊन शिथिल करण्याच्या हालचाली सुरू असताना मुंबई महापालिका कोरोनाचे रुग्ण आणि हाय रिस्क व्यक्तींसाठी 76 हजार खाटांची व्यवस्था करत आहे. आठवड्यापूर्वी महापालिकेने 50 हजार खाटा तयार करण्याचे ठरवले होते. 

महापालिकेच्या अंदाजानुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोनाचे 75 हजार रुग्ण असतील. त्यापैकी 63 हजार रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसतील. त्यामुळे रुग्णालयांत उपचार करण्या ऐवजी त्यांच्यासाठी महाकाय विलगीकरण केंद्रे तयार करण्यात येत आहेत. महापालिकेने गोरेगाव येथील राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान व हाजी अली येथील नॅशनल स्पोर्टस सेंटर ऑफ इंडिया येथे विलगीकरण केंद्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स येथे 300 खाटा, वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रात 100 खाटा, नेहरू तारांगणात 200 खाटा, जेजे रुग्णालयाजवळील रिचर्डसन अॅंड क्रुडास कंपनीत 200 खाटा अशी विलगीकरण केंद्रे उभारण्यात येत आहेत. त्यातील रिचर्डसन क्रुडास कंपनीतील विलगीकरण केंद्र सुरू झाले आहे. माहीम येथील निसर्ग उद्यानातही विलगीकरण केंद्र उभारण्याचा विचार सुरू आहे. 

एनएससीआयमध्ये 30 आयसीयू 
हाजी अली येथील नॅशनल स्पोर्टस सेंटर ऑफ इंडिया येथे 500 खाटांचे विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे 30 खाटा आयसीयू (अतिदक्षता कक्ष) म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहेत.

अशी तयारी सुरू 

  • हॉटेले, वसतिगृहे, क्रीडासंकुलांत 25 हजार खाटा 
  • शाळांमध्ये 35 हजार खाटा 
  • सध्या तयार 12 हजार खाटा

qurantine centers in Mumbai, arrangement of thousands of beds

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com