
नवी मुंबई : मुंबईतून नवी मुंबई मार्गे ठाणे येथे टेम्पोमधून लपवून नेला जाणारा तब्बल १४ लाख ४० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत असलेला गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त करण्याची कारवाई रबाळे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी केली. या कारवाईत पोलिसांनी गुटखा व पान मसाल्याचा साठा घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक करुन त्यांच्या ताब्यातील ६ लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त केला आहे. पोलिसांनी आता या गुटखा तस्करीत सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.