माथेरानमध्ये रेशनिंगसाठी गर्दी

नागरिकांना धान्य देताना पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
नागरिकांना धान्य देताना पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

माथेरानः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शहरे लॉकडाऊन केली आहेत. शहरांमध्ये संचारबंदी केली आहे. त्यानुसार माथेरानमधील सर्व दुकाने बंद ठेवली आहेत; मात्र सरकारमान्य रास्त भाव दुकान सुरू असल्याने नागरिकांनी रेशन दुकानासमोर गर्दी केली. पोलिसांच्या व व्यापारी फेडरेशनच्या सतर्कतेमुळे गर्दी हटवून प्रत्येकाला धान्य दिले.

रिक्षा, फेरीवाल्यांना बसलाय कोट्यवधींचा फटका
 
कोरोनामुक्त भारत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करीत आहे; मात्र नागरिकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. सरकार वारंवार सूचना करीत आहे की, घरामध्ये बसा बाहेर पडू नका. त्यानुसार माथेरानकर ही सूचना पळत आहेत; पण जीवनावश्‍यक वस्तू घेण्यासाठी लोकांची रेलचेल सुरू आहे. येथील सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात रेशनिंग मिळत आहे, असे नागरिकांना समजल्यावर हे धान्य घेण्यासाठी लोकांची लगबग सुरू झाली. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या वाड्या येथून लोक आले. त्यामुळे येथे गर्दी दिसून येताच येथील सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत काळे तसेच पोलिसांनी लोकांची गर्दी हटवली. व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश चौधरी यांनी प्रत्येकाला नंबर देऊन नंबरप्रमाणे धान्य देण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील गर्दी हटून एकेकास बोलावून धान्यवाटप केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com