Raigad News: परळीचे इनामदार असलेल्या सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांच्या समाधीचा शोध

Raigad News: परळीचे इनामदार असलेल्या सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांच्या समाधीचा शोध

Mumbai News: सुधागड तालुक्यातील परळी येथील इनामदार घराण्याचा तसेच या घराण्यातील कर्तबगार सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांच्या समाधीचा शोध घेण्यात इतिहास लेखक व संशोधक संदीप मुकुंद परब यांना पाच वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर यश आले आहे.

या विषया संदर्भातील संदीप मुकुंद परब यांचा लेख कोकण इतिहास पत्रिकेच्या जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ या अंकात प्रसिद्ध केला आहे.

Raigad News: परळीचे इनामदार असलेल्या सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांच्या समाधीचा शोध
Raigad News : मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड बस आगाराची रखडपट्टी

इनामदार घराण्याच्या ऐतिहासिक संदर्भाची माहिती मिळविण्याकरीता, त्रिंबक सूर्याजी प्रभू (चौबळ) यांचे ऐतिहासिक चरित्र, त्र्यंबकगड-अंजनेरी-रामसेज, ऐतिहासिक संकीर्ण निबंध खंड-१७ या साधनांचा तसेच सरदार त्रिबंक सुर्याजी प्रभू यांचे परळी येथे वास्तव्यास असलेल्या वंशजापैकी रितेश राजन इनामदार यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग झाला.

इनामदार घरण्याविषयी माहिती देतांना परब यांनी सांगितले की, या घराण्याचे मूळ नाव चौबळ यांचे गोत्र भारद्वाज राहणार कसबे चौल प्रांत मजकूर मामले मूर्तजाबाद येथील देशपांडे व कुलकर्णी पद या घराण्याकडे होते. ब्राह्मण टपा, उमटे टपा व मांडळ टपा (सद्यस्थितीत सदर वतने ही अलिबाग तालुक्यातील गावे असून त्यांची नावे मौजे बामणगाव, मौजे उमटे व मौजे मांडवे तर्फे बामणगाव अशी आहेत.

या तीन महालाची वतने या घराण्याकडे असून तळे ढोल (श्री शितलादेवी मंदिर आग्राव येथील तळे) येथे तळयाच्या पश्चिमेस यांचे वास्तव्य होते. या घराण्याचे मूळ पुरूष नारायण कृष्ण हे होत. या घराण्यातील मल्हार नारायण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता पदमदुर्ग हा किल्ला बांधून पोर्तुगिजांवर आपली जरब बसवली. यांचे धाकटे भाऊ सूर्याजी हे पुढे पहिल्या बाजीराव पेशव्याच्या नोकरीत होते.(kokan news)

Raigad News: परळीचे इनामदार असलेल्या सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांच्या समाधीचा शोध
Raigad News : जांभूळपाडा आरोग्‍य केंद्रात रुग्‍णांची परवड; धनुर्वातावरील इंजेक्शन तसेच खोकल्यांवरील औषधांचा तुटवडा

पराक्रमी सरदार

सदर मौजे परळी या गावाचे इनामदार सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू हे या सूर्याजी प्रभू यांचे सुपुत्र होय. परळी गावाच्या इनाम संदर्भात संदीप परब म्हणाले की, सन १७५०-५१ मध्ये नाशिक प्रांत व त्यातील त्र्यंबक गड निजामाच्या ताब्यातून मुक्त करण्याच्या कामगिरीवर पेशवे नानासाहेब यांनी त्रिंबक सूर्याजी प्रभू यांची नेमणूक केली. त्यांनी व नारो दामोदर यांनी मोठ्या शिताफीने त्रिंबकचा किल्ला पेशव्याच्या कब्जात आणला.

या लढाईत त्रिंबक सूर्याजी यांचा भाऊ सुंदरजी कामी आला नानासाहेब व भाऊसाहेब उभयता क्षेत्र मजकुरी आले तेव्हा त्यांनी नारो दामोदर व त्र्यंबक सूर्याजी यांचा वस्त्रादिक देऊन मोठा बहुमान केला व नारो दामोदरास मौजे तळेगाव पेटा त्रिंबक आणि त्रिवक सूर्याजीस कोकणात कल्याणा-लगत मौजे परळी नावाचा गाव पुत्रपौत्रादि वंशपरंपरा इनाम करून दिले.

पुराव्यांच्या आधारे सिद्ध

सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांना मिळालेले इनाम गाव, त्यांच्या वंशज्याच्या नावे असलेली मौजे परळी येथील जमीन, वाडा, परळी गावची जहागीरदारी खालसा केलेला जाहीरनामा तसेच परळी येथे राहत असलेले रितेश इनामदार त्यांचे मूळ पुरुष म्हणून पूजन करीत असलेली समाधी या सर्वांचा आधार घेऊन त्यांच्या वंशज्याच्या मालकीच्या घराजवळी जागेत असलेली समाधी ही सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू याचीच आहे हे ही संदीप मुकुंद परब यांनी सिद्ध केले आहे.

Raigad News: परळीचे इनामदार असलेल्या सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांच्या समाधीचा शोध
Raigad Festival: ‘हॅपिनेस इंडेक्‍स’ वाढवण्यासाठी कोट्यवधी खर्च पण प्रेक्षकांची पाठ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com