Mumbai Local
Esakal
मुंबई : उपनगरी रेल्वेत 'मद्यधुंद अवस्थेत प्रवास करून गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांविरोधात लोहमार्ग पोलिसांनी कडक मोहीम सुरू केली आहे. स्थानके आणि लोकल गाड्यांमध्ये विशेष तपासणी करण्यात येणार असून, मद्यधुंद अवस्थेत आढळणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईसह न्यायालयीन प्रक्रियाही राबविण्यात येणार आहे. नुकतेच पश्चिम रेल्वेवर २२ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.