

Railway NOC Mandatory
ESakal
रेल्वे रुळांच्या किंवा रेल्वेच्या जमिनीच्या ३० मीटरच्या आत कोणत्याही बांधकामासाठी रेल्वेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुंबई आणि इतर भागांमध्ये रेल्वेच्या जमिनीजवळ किंवा रुळांजवळ मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बेकायदेशीर बांधकामांच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाला मिळत आहेत. मुंबई आणि तिच्या उपनगरांमध्ये रेल्वे रुळांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. यामुळे रेल्वेच्या वाहतुकीत अडचणी निर्माण होतात आणि अपघातांचा धोका वाढतो.