

CSMT-Goregaon mumbai local Update
ESakal
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेची उभारणी केली जात आहे. पश्चिम रेल्वेवरील उपनगरी रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वेमार्गिका निर्माण करण्यासाठी हे काम सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम वेगात सुरु असून आता या कामादरम्यान सीएसएमटी ते गोरेगाव लोकल सेवा ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.