कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून....; रेल्वेने मुंबईत कसली कंबर...

संजय घारपुरे
Wednesday, 15 July 2020

सध्या मध्य रेल्वेवर 41 तर पश्चिम रेल्वेवर 32 रेक चालवण्यात येत आहेत. त्यांच्या एकंदर 702 फेऱ्या होत आहेत. या रेकचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी मध्य रेल्वेने 461 लाख रुपयांचे निर्जंतुक विकत घेतले आहे.

मुंबई : अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने मुंबईत लोकल सेवा सुरु करण्यात आली.  सध्या सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा खुली झाली नसली तरी लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. सर्व लोकल गाड्यांची साबण, पाण्यानेच नव्हे तर निर्जंतुकांद्वारेही नियमीतपणे सफाई होत आहे. 

उल्हासनगरातही 'धारावी पॅटर्न' राबवण्याचा निर्णय; पालिका आयुक्तांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकप्रतिनिधींशी संवाद

सध्या मध्य रेल्वेवर 41 तर पश्चिम रेल्वेवर 32 रेक चालवण्यात येत आहेत. त्यांच्या एकंदर 702 फेऱ्या होत आहेत. या रेकचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी मध्य रेल्वेने 461 लाख रुपयांचे निर्जंतुक विकत घेतले आहे. कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा, अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत या सात ठिकाणी त्याचा वापर केला जात असल्याचे वृत्त आहे.

ठाणे जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा; अध्यक्षपदी लोणे, तर उपाध्यक्षपदी पवार 

लोकल गाड्यांचे निर्जंतुकीकरण करताना कोणताही भाग सोडला जात नाहीत. त्यामुळे डब्यातील प्रत्येक कोपऱ्यापासून, हँडल्स, सीटस्, दरवाजे, आधारासाठी असलेले खांब, कोच पार्टिशन, खिडक्यांच्या जाळ्या, इलेक्ट्रीक स्वीच, पॅनेल्स यांच्यासह मोटरमन, गार्डच्या केबिनचीही स्वच्छता होत आहे. पश्चिम रेल्वेनेही याची अंमलबजावणी सुरु केली आहे. 

बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही; नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांचा अधिकाऱ्यांना इशारा...

मुंबईतील स्वयंसेवी संस्था लोकल सेवा सुरळीत ठेवण्यासाठी पुढे येत आहेत. क्लासिक केअर फाऊंडेशनने मोटरमनसाठी 250 फेस शिल्ड दिल्या आहेत. नियंत्रण कक्ष तसेच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 75 निर्जंतुक बाटल्या, 75 मास्क तसेच 200 ग्लोव्हज् दिले आहेत.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway administration starts sanitizing local trains completely