

Mumbai Local Train Door
ESakal
मुंबई : जगातील सर्वाधिक गर्दीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांपैकी एक असलेल्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये दारात लटकून प्रवास करणे हे जणू रोजचेच दृश्य आहे. परदेशातून आलेले प्रवासी मुंबईकरांचा हा जीवघेणा प्रवास पाहून थक्क होतात. मात्र आता मुंबईकरांना असा प्रवास करता येणार नाही. इच्छा असूनही दारात लटकून प्रवास करण्यावर कायमची मर्यादा येणार आहे.