Railway: नागरिकांसाठी आनंदाची बातमी; थर्टी फर्स्ट निमित्त रेल्वे सोडणार १२ विशेष लोकल!

local
localsakal

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उपनगरांमधून मुंबईत येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी (ता. ३१) रात्री १२ विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर आठ आणि मध्य रेल्वेवर चार विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटक दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, नरिमन पॉइंट, सीएसएमटी आणि गिरगाव चौपाटी परिसरात येतात. रात्री उशिरा किंवा पहाटे घरी जाण्यासाठी लोकल उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होते.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारदरम्यान धीम्या मार्गावर अप-डाऊन मार्गावर प्रत्येकी चार अशा आठ स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर अप- डाऊन धीम्या मार्गावर प्रत्येकी दोन अशा चार लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

local
Mumbai Local: लोकलमध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीला १ दिवसाची शिक्षा

चर्चगेट ते विरार सुटण्याची वेळ पोहोचण्याची वेळ

रात्री १.१५ रात्री २.५५

रात्री २ पहाटे ३.४०

रात्री २.३० पहाटे ४.१०

रात्री ३.२५ पहाटे ५.०५

विरार ते चर्चगेट

रात्री १२.१५ रात्री १.५२

रात्री १२.४५ रात्री २.२२

रात्री १.४० रात्री ३.१७

रात्री ३.०५ पहाटे ४.४१

सीएसएमटी ते पनवेल

रात्री १.३० रात्री २.५०

पनवेल ते सीएसएमटी

local
Mumbai Local: एसी लोकलमधील फुकट्यांविरोधात प्रशासन आक्रमक; ११५ कोटींचा दंड वसूल

पर्यटन तिकिटातून रेल्वेला एक कोटीचा महसूल

पर्यटकांसाठी रेल्वेतर्फे विशेष तिकीट सेवा सुरू करण्यात आली असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत एकूण दोन लाख ९४ हजार प्रवाशांनी पर्यटन तिकिटांच्या सुविधेचा लाभ घेतला. रेल्वेला त्यातून एक कोटी १० लाखांचा महसूल मिळाला.

यंदाच्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान एकूण २.९४ लाख प्रवाशांनी पर्यटन तिकिटांच्या सुविधेचा लाभ घेतला आहे. २.१४ लाख पर्यटकांनी द्वितीय श्रेणीने प्रवास केला. प्रथम श्रेणी / एसी वर्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ८० हजार १६८ होती. हिवाळ्यात म्हणजेच दिवाळी आणि नाताळात अशा तिकिटांना चांगला प्रतिसाद मिळतो.

local
Mumbai Local: प्रेयसी करत होती विना तिकीट प्रवास; टीसीने खडसावताच प्रियकराला आला राग अन्...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com