Nashik News: ‘एसटी’ला 615 कोटींनी पावली दिवाळी; 20 नोव्हेंबरला इतिहासातला विक्रमी गल्ला

ST BUS
ST BUS esakal

Nashik News: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने राज्यात दिवाळी हंगामात सर्व प्रवासी तिकिटांवर दहा टक्के भाडेवाढ केली होती. दिवाळीत लाखो प्रवाशांनी ‘एसटी’त प्रवास करून भरभरून प्रतिसाद दिला.

दहा टक्के भाडेवाढीने ‘एसटी’ने ६१५ कोटी रुपयांची कमाई केली. ८ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत भाडेवाढ करण्यात आली होती. (ST earned a record revenue of Rs 615 crore nashik news)

हंगामात २० नोव्हेंबरला एकाच दिवशी ‘एसटी’च्या इतिहासातील विक्रमी ३७ कोटी ६३ लाखांचा गल्ला तिकीट विक्रीतून मिळाला. गेल्या वर्षी दिवाळी हंगामात २१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत २१८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी उत्पन्नात जवळपास दुपटीने वाढ झाली.

एसटी महामंडळाने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास योजना लागू केली आहे. राज्य सरकारने महिलांनाही ‘एसटी’त प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली. या योजनेमुळे लालपऱ्या हाउसफुल्ल धावत असून, ‘एसटी’ला पुन्हा जीवनदान मिळाले आहे. विविध योजना व सवलतींमुळे सामान्यांसाठी ‘एसटी’ ही हक्काची झाली.

दिवाळी सुट्यांमध्ये नागरिकांनी पर्यटनस्थळ, धार्मिकस्थळ यासह विविध ठिकाणी भेटी दिल्याने ‘एसटी’च्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. गेल्या वर्षी २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान दहा टक्के भाडेवाढ केली होती, त्या वर्षी ११ दिवसांत ‘एसटी’ला २१८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

ST BUS
ST Bus Ticket : एसटी प्रवासात काढा यूपीआय, क्यूआर कोडद्वारे तिकीट; जळगाव विभागात सुविधा सुरू

यंदा ८ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ‘एसटी’ला राज्यातील प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने उत्पन्नात मोठी वाढ झाली. यात २० नोव्हेंबरला एकाच दिवशी ३७ कोटी ६३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकंदरीत दिवाळीत ‘एसटी’ने ६१५ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. दिवाळीच्या काळात अनेक ठिकाणी एसटी महामंडळातर्फे जादा बस सोडण्यात आल्या. या काळात अनेकांना सेवा दिल्याने पुन्हा एसटी बस नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे.

"नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अनेक मार्गांवर जादा बस सोडल्या होत्या. ‘एसटी’च्या सुखरूप प्रवासामुळे प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे निश्‍चितच ‘एसटी’च्या उत्पन्नात वाढ झाली. भविष्यातही प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचे काम एसटी महामंडळातर्फे केले जाईल. ‘एसटी’ने लाखो प्रवाशांचा विश्‍वास जिंकला आहे." - अरुण सिया विभाग नियंत्रक, नाशिक

ST BUS
Nashik News: ‘गोसावीं’च्या अहवालास अधिवेशनाचा अडसर; पुढील आठवड्यात कारवाईची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com