esakal | गणेशोत्सवाच्या काळातही रेल्वेकडून प्रवाशांची होणार लूट?
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या काळातही रेल्वेकडून प्रवाशांची होणार लूट?

गणेशोत्सवाच्या काळातही रेल्वेकडून प्रवाशांची होणार लूट?

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई: भारतीय रेल्वेवरून अनेक सुपरफास्ट गाड्या धावतात. या गाड्यांना सुपरफास्टचे विशेष दर आकारले जाते. मात्र, रेल्वेच्या विविध झोनमधील कोकण रेल्वेवरून 14 अशा गाड्या आहेत, ज्या नावानेच सुपरफास्ट असून सुपरफास्टच्या नियमांची पूर्तता करत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या डोळ्यांसमोरून तिकिटाद्वारे सुपरफास्ट गाडीच्या डब्याच्या श्रेणीनुसार 15 ते 75 रुपये प्रति प्रवासी आकारून लूट केली जातेय. (Railway Ministry Looting Passengers Travelers by charging additional fairs vjb 91)

हेही वाचा: कुंद्राच्या कार्यालयात मिळालं छुपं कपाट; अनेक 'राज' उलगडणार?

गणशोत्सव काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या सोडण्यात येतात. तर, नियमित, साप्ताहिक गाड्यांमधून प्रवासी कोकणात जातात. यामध्ये सुपरफास्ट गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी पसंदी देतात. मात्र, कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या 14 रेल्वे गाड्या सुपरफास्ट नियमात बसत नसताना सुद्धा प्रवाशांकडून सुपरफास्टचे शुल्क आकारले जाते. त्यामुळे गणपती काळातही प्रवाशांची अशीच लूट होणार आहे का, असा प्रश्न प्रवासी संघटनेकडून विचारला जात आहे.

हेही वाचा: भाभा रुग्णालयातून पाच वर्षाचा मुलगा बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल

रेल्वेच्या नियमानुसार कोणतीही गाडी सुपरफास्ट होण्यासाठी तिच्या दोन्ही दिशांचा सरासरी वेग किमान 55 किमी प्रतितास इतका असणे आवश्यक असते. यासाठी प्रति प्रवाशांच्या तिकिटात एक्झिक्युटिव्ह एसी-1 कोच 75 रुपये, एससी-2 कोच 45 रुपये, एसी-3 45 रुपये, प्रथम श्रेणी 45 रुपये, स्लिपर कोच 30 रुपये आणि व्दितीय श्रेणी 15 रुपये असा सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येतो.

कोकण रेल्वे मार्गावर अनेक गाड्या नियमित वेळापत्रकात सुपरफास्ट असल्या तरी कोकण रेल्वेवर 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक लागू केले जाते. ज्यात गाड्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे अनेक सुपरफास्ट गाड्यांचा वेग 50-52 किमी पर्यंत खाली येतो. म्हणजेच वर्षाच्या 365 पैकी 144 दिवस (39%) ह्या गाड्या सुपरफास्ट नसतात. साडेचार महिने हा फार मोठे काळ आहे. त्यामुळे रेल्वेने प्रतितास 55 किलोमीटर वेगाने न चालणाऱ्या गाड्यांवर सुपरफास्ट अधिभार लावू नयेत. कोकण रेल्वेवर आधीच 40% अधिभार आहे, मागील वर्षीपासून कोरोनाच्या नावाखाली स्पेशल रेल्वे चालवून 30% अधिकचे भाडे घेतले जाते. त्यात हा खोटा सुपरफास्ट अधिभार म्हणजे प्रवाशांचा तिहेरी छळ आहे, असे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी दिली.

हेही वाचा: वरळीत लिफ्ट कोसळून ५ जणांचा मृत्यू; आदित्य ठाकरे घटनास्थळी

या 14 गाड्या दोन्ही दिशेने सुपरफास्ट नियमांची पूर्तता करत नसताना देखील तिकिटांमधून सुपरफास्टचे भाडे आकारले जाते.

 • गाडी क्रमांक 01151/01152 जनशताब्दी एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 02119/02120 तेजस एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 01133/01134 मुंबई मंगळुरु एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 06071/06072 तिरुनेलवेली दादर एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 02619/02620 मत्स्यगंधा एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 06163/06164 गरीबरथ एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 02617/02618 मंगला एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 02197/02198 जबलपूर कोईम्बतूर एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 02475/02476 हिसार कोईम्बतूर एसी एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 01085/01086 एसी डबल डेकर एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 01099/01100 एसी डबल डेकर एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 01213/01214 लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 01149/01150 पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस

 • गाडी क्रमांक 09331/09332 इंदूर कोचुवेली एक्सप्रेस

आम्ही आवश्यक कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

loading image
go to top