Railway News: रेल्वे झाली सुपरफास्ट; २०० हून अधिक गाड्यांचा वेग वाढला!

काही वर्षांपासून मध्य रेल्वेने गाड्यांच्या वेग वाढवण्यासाठी रेल्वे मार्गाचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू केले. सिग्नल यंत्रणाही सक्षम केली जात आहे. यामध्ये मल्टीट्रॅकिंग (एका विभागात अनेक ट्रॅक टाकणे), ओव्हरहेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे.
Railway
Railwayesakal

मध्य रेल्वेने मिशन मोड अंतर्गत रेल्‍वेचा वेग ताशी १३० किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. २०२३-२४ साठी ट्रॅकचे नूतनीकरण, देखभालीच्या कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १२०६.७३ किमी रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या. त्यामुळे २०० हून अधिक मेल-एक्‍स्‍प्रेस गाड्यांचा वेग ताशी १३० किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. आता दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी विभागातील ३३७.४४ किमी मार्गाचे सक्षमीकरण सुरू आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये मध्य रेल्वे ४,१५१ किमीवर पसरली आहे. आतापर्यंत मरेवर १०० ते ११० किलोमीटर ताशी वेगाने गाड्या धावत होत्या. काही वर्षांपासून मध्य रेल्वेने गाड्यांच्या वेग वाढवण्यासाठी रेल्वे मार्गाचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू केले. सिग्नल यंत्रणाही सक्षम केली जात आहे. यामध्ये मल्टीट्रॅकिंग (एका विभागात अनेक ट्रॅक टाकणे), ओव्हरहेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे.

Railway
Central Railway : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तीन एक्स्प्रेस रेल्वे दहा दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

या मार्गाचे सक्षमीकरण

आतापर्यंत १२०६.७३ किलोमीटर रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण झाले. यामध्ये ७५.५९ किमीचा पुणे-दौंड विभाग, ५०९.०५ किमीचा इटारसी-नागपूर-वर्धा- बल्हारशाह विभाग, ९५.४४ किमीचा वर्धा-बडनेरा विभाग, ५२६.६५ किमीचा इगतपुरी-मनमाड-भुसावळ विभागाचा समावेश आहे.

Railway
Central Railway: धुक्यातही रेल्वे धावणार सुसाट! मध्य रेल्वेकडून यंत्रणा विकसित, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठे पाऊल

प्रवासाच्या वेळेत बचत

३३७.४४ किलोमीटर अंतराच्या दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी विभागात रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय १७ किमीच्या पुणतांबा-शिर्डी दरम्‍यान ताशी ७५ किमीवरून ११० किमी, ९ किमीच्या बडनेरा-अमरावती दरम्‍यान ताशी ६५ किमीवरून ९० किमी प्रतितास वेग वाढला आहे. रेल्‍वेचा वेग वाढल्‍याने प्रवाशांच्या वेळेत बचत होत आहे.

Railway
Konkan Railway: कोकण रेल्वेने प्रवास करण्यासाठी नक्की वाचा ही माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com