Railway News: आपण काही रेल्वेचे जवाई नाही,फुकट्यांना मराठमोळा डोस!

हटके पोस्टर बॉय आणि ६० वर्षाच्या आजीचा गौरव
Railway News
Railway Newssakal

नितीन बिनेकर

तिकीट न काढता फुकट.. फिरायला आपण काही रेल्वेचे जवाई नाहीत.... '५०० रुपयाच्या दंड भरण्यापेक्षा पाच रुपयांची तिकीट काढणे यालाच मराठीत शहापणा म्हणतात.. अशा आशयाचे मराठी भाषेत पोस्टर हात घेऊन मुंबईतील पोस्टर बॉय चेतनने पश्चिम रेल्वेच्या 'मेरा तिकीट मेरा इमान' स्पर्धेत सहभागी फुकट्याना मराठमोळा डोस दिला आहे.

तर ६० वर्षाच्या आज्जीने आपल्या मराठी कवितेच्या रिल्समधून तिकीट काढून प्रवसी करण्याचा संदेश लोकांची मने जिंकली आहे. त्यामुळे पोस्टर बॉय आणि आज्जीचे पश्चिम रेल्वेने विशेष गौरव केला आहेत.

Railway News
Railway Crime: रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने जळगावच्या तरुणाची मुंबईत फसवणूक

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी आणि योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी 'मेरा तिकीट मेरा इमान' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा २५ डिसेंबर ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित केली गेली होती. ३५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्वाधिक लाइक्सच्या आधारवर पश्चिम रेल्वेकडून तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. ज्यामध्ये एंजल माहेश्वरी, भूमी सोमाणी, चेतन गुप्ता आणि हिमांशू चावला यांनी प्रथम क्रमांक पटकावला, दिनेश आणि रोहन यांनी दुसरे, तर हर्षल आणि निकिता यांनी तिसरे स्थान पटकावले.

या तिन्ही विजेत्यांना पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आणखी सात स्पर्धकांना त्यांच्या सर्जनशीलतेसाठी गौरविण्यात आले. या स्पर्धेत सर्वाधिक चर्चा पोस्टर बॉय चेतन गणपत कोलगे आणि ६० वर्षाची आजी सोनाली रेडकर यांची होती (western railway)

पोस्टर बॉयच्या मराठी डोस

चेतन एका खासगी कंपनी काम करतोय, कोव्हिडनंतर चेतन सामाजिक विषयांवर पोस्टर लिहून आणि ते पोस्ट हात घेऊन सार्वजनिक स्थळी उभा राहतोय. लोकांमध्ये जनजागृती करतोय .अनेकदा चेतनचे पोस्टर समाज माध्यमानावर तुफान व्हायरल झाले आहे. चेतनने पश्चिम रेल्वेच्या 'मेरा तिकीट मेरा इमान' ह्या स्पर्धेत भाग घेतला होता. रेल्वे स्थानक आणि धावत्या रेल्वे गाड्यात पोस्टर घेऊन योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे महत्त्व अस्सल मराठी भाषेच पटवून दिले आहे. या संदर्भातील पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व सोशल मीडियाचे खात्यावर टाकले आहे. पश्चिम रेल्वेने पोस्टर बॉय चेतन गणपत कोलगे यांच्या विशेष गौरव केला आहे.

Railway News
Railway Crime: रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने जळगावच्या तरुणाची मुंबईत फसवणूक

गेल्या तीन वर्षांपासून विविध सामाजिक विषयांवर मी पोस्टर हात घेऊन लोकांमध्ये जनजागृती करतोय. पश्चिम रेल्वेच्या स्पर्धेत मी सहभागी झालो. त्यांनी माझ्या कलेचा विशेष गौरव केला त्यासाठी पश्चिम रेल्वेचे विशेष आभार मानतोय.

चेतन गणपत कोलगे, पोस्टर बॉय

फुकट्यावर आज्जीची कविता-

'एकशे सत्तरीची उमर गाठली

अभिवाद मज करू नका

कोटी कोटी जणासाठी सदैव धावणारी मी

कधी नव्हता माझ्यासाठी हिवाळा, उन्हाळा

पावसाळा,वादळ वारे किती आले किती गेले तरीही तटस्थ उभी राहिले मी........

म्हणूनच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका.....

रेल्वे आपली संपत्ती आहे... तिला जगवा आणि जगू द्या...

अशा शद्बा ६० वर्षाच्या सोनाली रेडकर या आज्जीने फुकट्या प्रवाशांवर कविता लिहिली, या कवितेचा व्हिडीओ बनवून पश्चिम रेल्वेच्या 'मेरा तिकीट मेरा इमान' ह्या स्पर्धेत भाग घेतला होता. पश्चिम रेल्वेने आज्जीचा व्हिडीओ आपल्या सर्व सोशल मीडिया खात्यांवर टाकला आहे. त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सोनाली रेडकर याचे विशेष कौतुक केलं आहे.

Railway News
Railway Station : देशभरातील सर्वच रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता गॅस वापराला बंदी

रेल्वेच्या गौरमुळे आज्जी भारवली-

सकाळाशी बोलताना सोनाली रेडकर यांनी सांगितले की, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे ग्रंथपाल या पदावरून निवृत्त झाली आहे. पूर्वीपासूनच मला कविता लिहिण्याच्या छंद होता. मात्र आजपर्यंत कोणत्याही स्पर्धेत मी सहभागी झाली नाही.

नोकरीत असताना भाईंदर ते परळ दररोज प्रवास करावा लागत होता. तसेच

पश्चिम रेल्वेची ही स्पर्धा बघितल्यानंतर मला या स्पर्धेत उपनगरीय लोकल विषयी आपली कविता मांडण्याची संधी मिळाली. मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाही. व्हिडिओ मला बनवता येत नाही. मात्र माझ्या मुलीच्या मदतीने मी व्हिडिओ रूपात माझी कविता तयार केली. कवितेचा व्हिडीओ पश्चिम रेल्वेला पाठविला. मला वाटलं नव्हतं की माझ्या कवितेची दखल पश्चिम रेल्वे घेतील. परंतु माझ्या कविताची दखल पश्चिम रेल्वे घेतली आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तसेच पश्चिम रेल्वेने मला मुंबई सेंट्रल विभागीय कार्यालयात बोलून विशेष गौरव केला त्याबद्दल मी रेल्वेचे आभार मानतो.

Railway News
Nagpur Railway Officer Bribe: बदलीसाठी लाच मागणाऱ्या रेल्वे अधीक्षकाला अटक! सीबीआयची कारवाई, खलाशाकडून घेतले इतके हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com