Railway News: भोंदू बाबांच्या जाहिरातीला चाप लावण्यासाठी 'या' महिला आमदाराने घेतला पुढाकार!

अंधश्रद्धा विरोधात आमदारांची मोहीम; रेल्वे सुरक्षिततेसाठी पाऊल
Railway bhondu baba news
Railway bhondu baba news sakal

मध्य रेल्वेत भोंदू बाबांच्या जाहिराती लावून रेल्वेचे विद्रुपीकरणासोबतच अंधश्रद्धेला खतपाणी घालून दरवर्षी हजारो नागरिकांना फसविण्याच्या प्रकरणाच्या विरोधात शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी पुढाकार घेतला असून आज लोहमार्ग पोलीस आयुक्तांना याबाबत योग्य कारवाई करण्याचे निवेदन सादर केले.

याविषयी अधिक माहिती देताना शिवसेना सचिव, आमदार डॉ. मनीषा कायंदे सांगतात, " मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये भोंदू बाबांच्या जाहिराती चिटकवणाऱ्या विशेषतः मस्जिद बंदर रेल्वे स्थानकांत काही टोळ्या कार्यरत आहेत. हजारो प्रवाशांच्या देखत तरुणांची टोळी उपनगरी रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये घुसून जाहिराती चिटकवत आहे. असे प्रकार महिलांच्या डब्यातही घडत आहेत.(Railway bhondu baba news )

Railway bhondu baba news
Railway Recruitment : रेल्वेतील ५,६९६ जागांसाठी वयाची अट शिथिल ; सहायक लोको पायलट भरतीसाठी १९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असते. भोंदूबाबांच्या फसव्या दाव्यांमुळे काही महिला त्यांच्याशी संपर्क साधतात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात. त्यांना लूटण्यात येते. त्यांचा मानसिक, शारिरीक छळ करण्यात येतो. या प्रकाराला वेळीच आळा घातला, तर अनेकांना फसवणूक होण्यापासून वाचवता येऊ शकते.

Railway bhondu baba news
Nagpur Railway Officer Bribe: बदलीसाठी लाच मागणाऱ्या रेल्वे अधीक्षकाला अटक! सीबीआयची कारवाई, खलाशाकडून घेतले इतके हजार

मध्य रेल्वे दिवसेंदिवस आपले कोच बदलतेय, प्रवाशांना प्रसन्न वाटावं म्हणून रंगसंगतीत बदल करतेय, पण हे भोंदूबाबा हा कोच विद्रुप करुन टाकत आहेत . या देशात अंधश्रद्धा आणि रेल्वेला नुकसान पोहोचवणाऱ्यांविरोधात कायदा असून यांचा योग्य वापर रेल्वे प्रशासनाने तातडीने करावा हीच आमची मागणी आहे. "

भविष्यात महिलांना रेल्वेने सुरक्षित प्रवास करता यावा तसेच अनुचित घटना घडू नये यासाठी शिवसेना सचिव आमदार डॉ. मनीषा कायंदे लवकरच अतिरिक्त पोलीस महासंचालक रेल्वे सुरक्षा डॉ प्रज्ञा सरवदे, पोलीस आयुक्त ( रेल्वे ) डॉ. शिसवे तसेच महाव्यवस्थापक मध्य रेल्वे शुक्ला यांची भेट घेऊन पुढील कारवाईची मागणी करणार आहेत.

Railway bhondu baba news
Nashik Railway Station: रेल्वे स्थानकावर वाढवणार CCTV कॅमेऱ्यांची संख्या! गुन्हेगारांवर असणार करडी नजर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com