Railway News: पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले तब्बल 'इतके' कोटी

Railway News: पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले तब्बल 'इतके' कोटी

Railway News: पश्चिम रेल्वेवर शून्य भंगार मोहिम राबविण्यात येते. या मोहिमेंतर्गत पश्चिम रेल्वेने आर्थिक वर्ष २०२३-२४ भंगार विक्रीतून ४६९ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सर्व स्थानके, विभाग, प्रतिष्ठाने, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व रेल्वे स्थाने/विभाग भंगारमुक्त करण्यासाठी “शून्य भंगार मोहीम” साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभाग, कारखान्यातील भंगार गोळा करण्यात येते.

Railway News: पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले तब्बल 'इतके' कोटी
Railway News: पनवेल-नांदेड दरम्यान ४० समर स्पेशल गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

जूने इंजिन, डिझेल इंजिन, रूळ, जुने किंवा अपघाती इंजिन/डबे यांसह विविध प्रकारच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यात येते. लोह, स्टील, अ‍ॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री करण्यात येते.

पश्चिम रेल्वेने १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत भंगार विक्रीतून ४६९.२७ कोटी रुपये मिळविले आहे. भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूल मिळवण्यातच मदत झाली नाही तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे.

Railway News: पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले तब्बल 'इतके' कोटी
Railway News: भारतीय रेल्वेचा विक्रम; यंदा ९१११ उन्हाळी विशेष ट्रेन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com