मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई उपनगरात गुरुवारी सकाळी पासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे लोकल सेवा अगोदरच धीम्या गतीने धावत होत्या.
mumbai local railway
mumbai local railwaysakal
Summary

मुंबई उपनगरात गुरुवारी सकाळी पासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे लोकल सेवा अगोदरच धीम्या गतीने धावत होत्या.

मुंबई - मुंबई- उपनगरात गुरुवारी सकाळी पासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे लोकल सेवा अगोदरच धीम्या गतीने धावत होत्या. त्यातच मुंबई सेंट्रल -विरार लोकल आणि छप्रा एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, काही कालावधीत हा बिघाड दुरुस्त करून रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली. दोन्ही बिघामुळे आणि दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे लोकल सेवांच्या वेळापत्रकार मोठा परिणाम झालेला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर मीरा रोड ते दहिसर स्थानकांदरम्यान अप जल मार्गावर गुरुवारी दुपारी १.५४ च्या सुमारास मुंबई सेंट्रल ते विरार लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे तब्बल अर्धा तास चर्चगेटला जाणाऱ्या लोकल सेवा एकामागे एक खोळंबल्या होत्या. मात्र,पश्चिम रेल्वेने हा बिघाड तात्काळ दुरुस्त करून लोकल सेवा पूर्ववत केल्या. तर मध्य रेल्वेच्या आसगांव स्थानकादरम्यान ट्रेन क्रमांक ११०५९ छप्रा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी दुपारी विस्कळीत झाली होती.

या घटनेमुळे एकामागे एक रेल्वे गाड्या उभ्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे एक जोड इंजिन पाठवून छप्रा एक्स्प्रेस मार्गस्थ करण्यात आले. मात्र, या दोन्ही घटनांमुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांना आणि मेल- एक्स्प्रेस गाडयांना लेटमार्क लागला आहे.

मुंबई,ठाणे, कल्याण, नवी मुंबई पट्ट्यात गुरुवारीस सकाळी पासून सुरु असल्याला पावसाने दुपारनंतर जोर पकडला होता. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कुर्ला मार्गावरील लोकल अतिशय धीम्या गतीने धावत आहे. परिणामी मध्य रेल्वेवरील अप -डाऊन मार्गावरील धीम्या आणि जलद लोकल सेवा १०ते १५ मिनिटे उशीराने धावत आहे. पावसामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक मंदावली असून, याचा फटका प्रवाशांना बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com