esakal | मध्य रेल्वे म्हणते, प्रवाशांच्या पिशव्यांमुळे रेल्वेला लेटमार्क!
sakal

बोलून बातमी शोधा

train crowd

रेल्वे डब्यातील आपत्कालीन चेनच्या हुकला अडकवलेल्या सामानांमुळे गेल्या वर्षभरात 800 लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबावे लागल्याचे उघडकीस आले आहे.

मध्य रेल्वे म्हणते, प्रवाशांच्या पिशव्यांमुळे रेल्वेला लेटमार्क!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वे डब्यातील आपत्कालीन चेनच्या हुकला अडकवलेल्या सामानांमुळे गेल्या वर्षभरात 800 लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबावे लागल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई विभागातही तब्बल 580 वेळा असे प्रकार घडल्याने लोकलसेवा रखडली होती. एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 या काळात मुंबईत मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या 2 हजार 357 गाड्या चेन पुलिंगमुळे थांबल्या. त्यात 800 हून अधिक वेळा सामान काढताना नकळतपणे चेन खेचली गेल्याची नोंद झाली आहे. 

महत्वाची बातमी ः भावगीत गायक विनायक जोशी कालवश

लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांकडून गर्दीमुळे रेल्वेमध्ये जिथे जागा मिळेल तिथे पिशव्या ठेवल्या जातात. यामध्ये आपत्कालीन चेनच्या हुकालाही पिशवी अडकवली जाते. परिणामी घाईगडबडीत रेल्वेतून उतरताना चेनच्या हुकला अडकवलेली पिशवी काढताना आपत्कालीन चेन नकळतपणे खेचली जाते. आपत्कालीन चेन खेचल्यामुळे मोटरमनलाही आपत्कालीन ब्रेक लावावा लागतो. या सर्व गोंधळामुळे एक रेल्ने रखडल्यामुळे त्या मागील इतर रेल्वेंनाही विलंब होतो. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सुटणाऱ्या 34 टक्के मेल-एक्‍स्प्रेसला या प्रकारामुळे थांबावे लागते; तसेच मुंबईतून सुटणाऱ्या 42 टक्के गाड्या विलंबाने शेवटच्या ठिकाणी पोहचात, असा अहवाल रेल्वे पोलिसांनी तयार केला आहे. 

महत्वाची बातमी ः ठाणे पालिकेत सत्ताधारी, प्रशासन आमने-सामने 

चेन पुलिंगचे प्रमाण दुप्पट 
एप्रिल 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान 1 हजार 658 गाड्यांना या कारणामुळे लेटमार्क लागला होता; तर एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत 2 हजार 257 घटनांमुळे गाड्यांना विलंब झाल्याची नोंद आहे. चेन पुलिंगच्या कल्याण स्थानकात सर्वाधिक घटना म्हणजे 328 नोंदी, तर ठाणे स्थानकात 154 नोंदी झाल्या आहेत. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या 46 गाड्यांमध्ये वारंवार चेन पुलिंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

महत्वाची बातमी ः सासू सासऱ्यांकडून 'त्याचा' होत होता छळ

एलएचबी कोचमुळे ट्रेनला लेटमार्क 
रेल्वेने प्रवाशांना वेगवान आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच रेल्वेला अत्याधुनिक लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) कोच जोडण्यात येत आहेत; मात्र याच रेल्वेमध्ये आपत्कालीन चेनला धक्का लागल्यामुळेही रेल्वे थांबण्याच्या घटनांची संख्या सर्वाधिक आहे. सामान ठेवताना नजरचुकीने आपत्कालीन चेनला फक्त धक्का लागल्याने गेल्या 10 महिन्यांमध्ये रेल्वे थांबण्याच्या 56 घटना घडल्या आहे. 

प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी रॅकची सुविधा उपलब्ध आहे. विनाकारण चेन खेचणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे प्रवाशांनी चेनच्या हुकला त्यांच्या पिशव्या अडकवू नयेत. 
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 
 

loading image