esakal | गणेशोत्सवानंतर मुंबईत पावसाची पुन्हा दडी; शनिवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवानंतर मुंबईत पावसाची पुन्हा दडी; शनिवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता

मुंबईत पावसाने पुन्हा दडी मारली आहे. शनिवारपर्यंत हलक्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.

गणेशोत्सवानंतर मुंबईत पावसाची पुन्हा दडी; शनिवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता

sakal_logo
By
समीर सुर्वे


मुंबई : मुंबईत पावसाने पुन्हा दडी मारली आहे. शनिवारपर्यंत हलक्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.  तर, बुधवारी (ता. 8) ठाणे, रायगड, रत्नागिरीत जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. दक्षिण कोकणातही शुक्रवारपासून पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.

बेकायदा बांधकामप्रकरणी कंगनाला BMC नोटीस; चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा

कुलाबा येथे आज कमाल 32.7 आणि किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथे कमाल 32.8 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस तापमान याच पातळीवर राहाणार आहे. मुंबईत आज पुन्हा उकाडा जाणावत होता. मात्र, गेल्या आठवड्यापेक्षा उन्हाची तिव्रता कमी झाली आहे.

पालघरमध्येही शनिवारपर्यंत हलक्या सरीचा अंदाज आहे. ठाण्यात आज जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. रायगड, रत्नागिरीत पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहाणार आहे. शुक्रवारपासून रायगड, रत्नागिरी सिंधूदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 

केंद्र सरकारच्या विविध धोरणाविरोधात युवक काँगेसचा मोर्चा; कोकण भवन येथे अंसख्य कार्यकर्ते उपस्थित

सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस
केंद्रीय वेधशाळेने सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यात 20 सप्टेंबरपर्यंत संपुर्ण राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )