केंद्र सरकारच्या विविध धोरणाविरोधात युवक काँगेसचा मोर्चा; कोकण भवन येथे अंसख्य कार्यकर्ते उपस्थित

सुजित गायकवाड
Tuesday, 8 September 2020

कोकण भवन वर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्च्याचे नेतृत्व नवी मुंबई युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुबिन थॉमस,उपाध्यक्ष सुधीर पाटील, प्रवक्ते आनंद सिंग बंटी आदीने केले.

 

तुर्भे : केंद्र शासन विविध धोरणे राबवत आहे.पण या मुळे वाढत असलेली बेरोजगारी व बंद पडत असलेले छोटे मोठे उद्योग धंदे.याचा सर्वसामान्य जनजीवणावर विपरीत परिणाम होत आहे.म्हणून मंगळवारी सकाळी अकरा वाजता नवी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने कोकण भवन वर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्च्याचे नेतृत्व नवी मुंबई युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुबिन थॉमस,उपाध्यक्ष सुधीर पाटील, प्रवक्ते आनंद सिंग बंटी आदीने केले.

रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची वारेमाप लूट; दरेकर यांचा सरकारवर हल्ला

 युवक काँग्रेसने काढलेल्या मोर्चा मध्ये त्यांच्या मागण्या मध्ये मोदी सरकारने दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन पाळले नाही.नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म लघु मध्यम उधोगाला मोठा फटका बसने,त्यातच वस्तू सेवा कर मुळे लघु माध्यम उधोगाचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे.त्यानंतर लॉक डाऊन मुळे 12 ते 13 करोड लोक बेरोजगार होणे हे सर्व केंद्र सरकारच्या लहरीपणामुळे झाले आहे.त्यातच देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे.त्यामुळे नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे.अर्थव्यवस्था ढासळलेल्या मुळे जेडीपीचस दर एप्रिल व जून या तीन महिन्यात शून्यखाली घसरून 23.9 टक्क्यांनी आक्रसल्याचे समोर आले आहे असे मोर्च्या मध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुबिन थॉमस यांनी सांगितले.

केंद्र सरकार राज्यांना विश्वासात न घेता  अडमुठे धोरण राबवून नीट,जेईई परीक्षेचा निर्णय असो वा राज्यांना जीएसटी मधील वाटा. यामुळे राज्याची अवस्था गंभीर होत चालली आहे.खरतर सध्याच्या परिस्थितीत राज्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.परंतु असे करताना दिसत नाही.केंद्र शासनाच्या या वागणुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे.तर बिगर भाजप सरकार असणाऱ्या राज्यांनाही कारभार करणे मुश्किल झाले आहे.सरकारी आस्थापणानंचे खासगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा केंद्र सरकार राबवत असल्याचा आरोप मोर्चात करण्यात आला.

राज्यातील कोव्हिड सेंटर्स भ्रष्ट्राचाराचे कुरण; देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत घणाघात

मोर्च्याची सुरुवात आग्रोली येथील तलावापासून काढण्यात आला.तसेच कोकण भवन येथे मोर्च्याचे समारोप करण्यात आला. युवक काँग्रेसचे निवेदन कोकण भवनाचे उपायुक्त मनोज कानडे यांनी स्वीकारले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोष शेट्टी,रामचंद्र दळवी,नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक,महिला अध्यक्षा उज्वला साळवे,  युवक प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी ब्रिज किशोर दत्त,रिशिका रका ,कॅरिना झेवीयर,अभिजित शिवरकर, डोमाकोंडा,आफ्रिदी शेख, सर्वेश दुबे,निझाम अली शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Congress march against various policies of the Central Government; Numerous activists present at Konkan Bhavan