Raj Thackeray
esakal
रेल्वे भरतीत परप्रांतियांविरोधात मनसेकडून २००८मध्ये आंदोलन करण्यात आलं होतं .२००८मध्ये कल्याण स्थानकात मनसैनिकांकडून परप्रांतियांना मारहाण करण्यात आली होती. या आंदोलनात परप्रांतियांना मारहाण झाल्याचा आणि रेल्वेचं नुकसान केल्याचं म्हणत राज ठाकरे यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले होते. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भडकावणारे भाषण केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र कोर्टाने राज ठाकरे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केलीय. राज ठाकरेंसह इतर आरोपींनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे.