Raj Thackeray | विश्वास नांगरे पाटलांनी काही मशिदींना परवानगी दिली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray

Raj Thackeray | विश्वास नांगरे पाटलांनी काही मशिदींना परवानगी दिली

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी काल संपला. त्याआधीच पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली. राज्यभरात मशिदींबाहेर पोलीस फौजफाटा तैनात आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. (Raj Thackeray on Hanuman Chalisa)

सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर अखेर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय. कोणत्याही परिस्थितीत भोंगे बंद झाले पाहिजे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. (Raj Thackeray Tweets Video of Balasaheb Thackeray)

हेही वाचा: संदीप देशपांडेंची पोलिसांच्या हातावर तुरी, 'शिवतीर्थवर' समोरच चकवा

विश्वास नांगरेंचा फोन आला होता

पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मला माहिती दिली. ठराविक मशिदींवर अजान घेण्यात परवानगी दिल्याचं त्यांनी सांगितलं. पण अनधिकृत मशिदींवर भोंगे बसवण्यात आले आहेत. त्याला सरकार अधिकृतपणे परवानगी कशी दिली, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

आम्हीही आमच्या धर्माला चिटकून राहणार

आज अजान पार पडलेल्या १३५ मशिदींवर मुंबई पोलीस काय कारवाई करणार आहेत, ही भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. पोलिसांनी यावर कारवाई करावी. माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर कारवाई होणार असेल, तर होऊ दे. माणूसकीपेक्षा यांचा धर्म मोठा होत असेल, तर आम्हीही आमच्या धर्माला चिटकून राहू, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

हेही वाचा: पवारांच्या घराबाहेर ST कर्मचारी आक्रमक; विश्वास नांगरे पाटील Action Mode मध्ये

  • ज्या मशिदीत मौलवी ऐकणार नाहीत , तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागणार

  • मुंबई पोलीस या १३५ मशिदींवर काय कारवाही करणार आहेत ? हे एकदा समजू दे

  • कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार सरकारने करावा

  • तुम्ही प्रार्थना करा, धर्म तुमच्या घरात असायला पाहिजे

  • आम्हाला धार्मिक सलोखा बिघडवायचा नाही, पण तुम्ही धार्मिक घेतलं तर आम्हीही घेऊ

  • महाराष्ट्रतील ९०-९२ टक्के मशीदींमध्ये आज अजान झाली नाही

  • मौलवींना माझा विषय समजला

  • हा विषय क्रेडिट घेण्याचा नाही. हा सामाजिक विषय आहे

  • आपल्या घरच्या मिक्सरच्या आवाज इतकाच डेसीबल असावा

  • हा विषय फक्त सकाळच्या अजान पुरता नाही. दिवसभरात जर त्यांनी परत अजान दिली. तर अमाचे लोक त्या त्या वेळेला हनुमान चालिसा वाजवणार

Web Title: Raj Thackeray Holds Press Conference On Hanuman Chalisa Row

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeray
go to top