पवारांच्या घराबाहेर ST कर्मचारी आक्रमक; विश्वास नांगरे पाटील Action Mode मध्ये

IPS Officer Vishwas Nangare Patil
IPS Officer Vishwas Nangare Patil Sakal

ST Workers Protest In Mumbai : आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अनपेक्षितपणे एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्याला घेराव घातल्याचे पाहायला मिळाले. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar ) मुंबईतील सिल्हर ओकवर जाऊन आंदोलनाचा आक्रम पवित्रा घेतला. त्यांनी हे पाऊल उचलल्यामुळे सुरक्षा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले. हा पेच सोडवण्यासाठी मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (IPS Officer Vishwas Nangare Patil) स्वत: घटनास्थळी पोहचले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही आंदोलनकर्त्यांना स्कूल व्हॅनमधून आझाद मैदानाच्या दिशेने नेण्यात आल्याचे समजते आहे.

IPS Officer Vishwas Nangare Patil
शरद पवार हाय हाय... एसटी कर्मचाऱ्यांची 'सिल्व्हर ओक'वर चप्पलफेक

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यावर उपस्थितीत झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. पोलिसांना या आंदोलनाची कोणतीही कल्पना नव्हती. घटनेची माहिती मिळताच पोलिस या याठिकाणी पोहचले. आंदोलनकर्त्यांनी शरद पवारांच्या बंगल्याबाहेर येऊन चप्पल आणि दगडफेक केल्याची धक्कादायक घटनाही घडली आहे. या आंदोलनावेळी सुरुवातीला मोजक्या संख्येनं पोलिस बंदोबस्त असल्याने आंदोलक बंगल्याच्या मुख्य गेटपर्यंत पोहचल्याचे पाहायला मिळाले. याआधीही शरद पवारांच्या बंगल्यावर आंदोलने झाली आहेत. पण अगदी गेटपर्यंत आंदोलक पोहचण्याची ही पहिलीच वेळ ठरलीये.

IPS Officer Vishwas Nangare Patil
'माझी आई आणि मुलगी घरात..' सुप्रिया सुळे थेट संतप्त कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात

पोलिसांनी स्कूल बसमधून आंदोलकांना नेले आझाद मैदानावर

अचानकपणे झालेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वत: घटनास्थळी दाखल झाले. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना स्कूल बसमधून आझाद मैदानाच्या दिशेनं नले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com