महाराष्ट्रधर्मासाठी 'अमित ठाकरे' सक्रिय राजकारणात..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

मुंबई : अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात कधी सक्रिय होणार याची सर्वच स्तरातून कायमच चर्चा होती. अशात आता आज होणाऱ्या मनसेच्या महामेळाव्यातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग करणार असल्याचं बोललं जातंय. मुंबईतील गोरेगावात नेस्को मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्यावहिल्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हजारोंच्या संख्येने मनसैनिक उपस्थित आहेत.  

गेल्या  अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळाल्यात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज आपला झेंडा बदलणार आहे, आपली भूमिका बदलणार आहे. अशातच ठाकरे घराण्यातील आणखी एक ठाकरे 'अमित ठाकरे' राजकारणात पदार्पण करताना पहिला मिळेल.  

मोठी बातमी -  'ते' आधी निर्जनस्थळी न्यायचे; मग करायचे...

खरतर अमित ठाकरे यांचा तरुण वर्गात एक मोठा चाहतावर्ग आहे. लोकांना अमित ठाकरे यांच्याबद्दल कायम एक अप्रूप आहे. ज्याचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला येत्या काळात होऊ शकतो. मुंबईतील आरे कारशेडचा मुद्दा अमित ठाकरे यांनी लावून धरलेला. त्या आंदोलनात अमित यांचा सक्रिय सहभाग असल्याचं पाहायला मिळालं होतं. नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी देखील अमित ठाकरे धावून आलेले पाहायला मिळाले होते. अमित ठाकरे यांनी थाळीनाद आंदोलन देखील केलं होतं. मात्र अमित ठाकरे यांनी मनसेच्या मोठ्या व्यासपीठावरून भाषण अद्याप केलेलं नाही. 

raj thackeray to launch his son amit thackeray to the politics of maharashtra

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackeray to launch his son amit thackeray to the politics of maharashtra