मास्क लावून जनतेची तोंडं कायमची बंद करता येणार नाहीत!

मास्क लावून जनतेची तोंडं कायमची बंद करता येणार नाहीत! राज्यातील कोरोना आटोक्यात आला असूनही लॉकडाउन उठवण्यास सरकारची टाळाटाळ Raj Thackeray led MNS Leader Sandeep Deshpande Angry Lockdown Local Trains Issue
Raj and Uddhav thackeray
Raj and Uddhav thackeray

राज्यातील कोरोना आटोक्यात आला असूनही लॉकडाउन उठवण्यास सरकारची टाळाटाळ

मुंबई: राज्यात विविध प्रश्न आ वासून उभे असताना विधीमंडळाचे अधिवेशन राज्य सरकारने दोन दिवसात गुंडाळले. भाजपाच्या (BJP) १२ आमदारांचं पहिल्या दिवशी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं. या मुद्यावरुन विधिमंडळ परिसरात पायऱ्यांवरच (Maharashtra assembly) भाजपाने प्रत-विधानसभा (Vidhan Sabha) सुरु केली आणि सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला. विविध आरक्षणांचे मुद्दे, सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल अशा अनेक प्रश्नांवर अधिवेशनात चर्चाच झाली नाही. तशातच, लॉकडाउनदेखील उठवण्याबाबत ठोस भूमिका सरकारने जाहीक केली नाही. त्यामुळे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्वीटच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक, दोघांवरही टीका केली. (Raj Thackeray led MNS Leader Sandeep Deshpande Angry Lockdown Local Trains Issue)

Raj and Uddhav thackeray
विधानभवनाबाहेर राडा; भाजप नेत्यांकडून माईक, स्पिकर काढून घेतला...

केवळ विरोध दर्शवून गोष्टींची उत्तर मिळू शकत नाहीत. प्रश्नांची उत्तर मागण्यासाठी विरोधी पक्षाने जाब विचारायला हवा. लोकांच्या अनेक समस्या आहेत पण त्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधक बोलले नाहीत. त्याउलट विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधकांनी बाहेर आपली वेगळी विधानसभा भरवली आणि आपले विषय पुढे रेटले. हे चुकीचे आहे, अशा आशयाचे ट्वीट करत देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली. "वाद - प्रतिवाद, टोला - प्रतिटोला, विधानसभा - प्रतिविधानसभा ही नाटक संपली असतील तर जरा जनतेचा विचार करा. टाळेबंदीमुळे जनता पिचली आहे. लोकल प्रवासाची मुभा द्यावी. मास्क लावून जनतेचं तोंड कायमच बंद करता येणार नाही", अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

Raj and Uddhav thackeray
"सचिन वाझे जमा केलेले पैसे अनिल देशमुखांच्या पीएला द्यायचा"

दरम्यान, अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाउन आणि रेल्वे सेवेबाबत प्रश्न विचारण्यात आला. पण त्याबद्दल फारसे सकारात्मक उत्तर मिळाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com