esakal | राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मुंबईत भेट ? कशासाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मुंबईत भेट ? कशासाठी...

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मुंबईत भेट ? कशासाठी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीत शिवसेना जो कट्टर हिंदुत्त्ववादी पक्ष आहे तो सेक्युलर पक्षांसोबत जाताना पाहायला मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालाय तो म्हणजे 'राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रू देखील नसतो. याच वाक्याची प्रचिती देणारी आणखीन एक घटना आज मुंबईत घडल्याचं सूत्रांकडून समजतंय. बातमी आहे महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणारी. मुंबईतील परळमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांना भेटलेत. 

शिवसेनेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्यांची पोकळीक भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपयोग होऊ शकतो. कारण ज्या प्रखर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपमध्ये वैचारिक एकी होती याच मुद्द्यावर चालणारा मनसे हा पक्ष आहे. नुकताच मनसेने आपला झेंडा बदलण्याचा निर्णय घेतलाय. त्यामाध्यमातून मनसे प्रखर हिंदुत्त्वाकडे झुकत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 

मोठी बातमीउद्या भारत 'बंद' आहे माहितीये ना ?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात परळमधील एका रहिवासी इमारतीमध्ये तब्बल दीड तास चर्चा सुरु होती. अशात राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीची फाईल अजून केंद्रात आहे. त्यासंदर्भात देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. या बैठकीत महाविकास आघाडीच्या विरुद्ध हिंदू मतांचा राजकारणाबाबतही चर्चा झाल्याचं समजतंय. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांनी घरोबा केला तर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप मनसे समीकरण पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे.  


मोठी बातमी : मुंबई महानगरपालिकेत ६८० कोटींचा पाणी घोटाळा..
 

कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते बाळा  नांदगावकर यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत जाण्याचे संकेत देणारे एक सूचक विधान केलं होतं. अशातच आज मुंबईत राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट विविध चर्चांना हवा देणारीच मानवी लागेल. 

raj thackeray met devendra fadanavis in residential building of parel says sources

loading image