raj thackeray present at pm modi meeting also did political campaign for shrikant shinde
raj thackeray present at pm modi meeting also did political campaign for shrikant shindeSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला राज ठाकरेंची उपस्थिती; शिंदेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे कळव्यात धडाडणार

खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी पदाधिकारी बैठकीस उपस्थित

डोंबिवली - कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी 12 मे रोजी कळवा खारेगाव येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात राज यांनी तोफ धडाडणार असून त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर कल्याण पश्चिम येथे 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. आणि 17 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क येथे सभा होणार असून या सभेला राज ठाकरेही उपस्थिती असणार आहेत.

या सर्वं सभांच्या नियोजनांसाठी डोंबिवलीत शिवसेना, भाजपा , मनसे, राष्ट्रवादी, आरपीआय पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह सर्वच महायुती मुख्य पदाधिकारी उपस्थिती होते.

आमचा फोकस आमच्या सभांवर, बाकीच्या पक्षाच्या कुठे किती सभा आहे, याच्यामध्ये आम्हाला रस नाही.... मनसे आमदार राजू पाटील यांचे महाविकास आघाडीच्या सभेवर उत्तर मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की महायुतीला उत्स्फूर्त पाठिंबा आहे.

राज साहेबांची सभा कणकवली मध्ये झाली दहा तारखेला पुण्याला सभा 12 तारखेला कल्याण लोकसभेत कळवा येथे खारेगाव इकडे सभा होणार आहॆ. सगळ्यात महत्त्वाची सभा म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 17 तारखेला छत्रपती शिवाजी पार्क मैदानात याच्या नियोजनासाठी आम्ही बैठक घेतली.

राज ठाकरे यांची 17 तारखेची सभा ही शेवटची असेल. राज यांची सभा म्हटलं की आमचा फॉरमॅट ठरलेला असतो. आढावा घेऊन आम्ही आमच्या कामाला निघतो. मात्र यावेळेस महायुतीसाठी काम करतोय, पंतप्रधान मोदिंसाठी काम करतोय.

इतर पक्षाची ही साथ मिळते ती सभा जोरात होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही 12 तारखेच्या कळवा परिसरातील सभेला उपस्थित राहण्याचे शक्यता. निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पाहतोय. आमचा फोकस आमच्या सभांवर बाकीच्या पक्षाच्या कुठे किती सभा आहे.

याच्यामध्ये आम्हाला रस नाही. सभा होत असतात 15 तारखेला मोदीची सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळ्यांच्या सभा होतात मात्र आमच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे आमदार पाटील म्हणाले.

खासदार शिंदे यांनी सांगितले की कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी 15 तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत. भिवंडी लोकसभेत त्यांची सभा आयोजित केली आहे. या आयोजनासाठी या ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी,

नेते, कार्यकर्ते यांची बैठक घेतली गेली. यासाठी नियोजनाची बैठक झाली आहे. पंधरा तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट येथे सभा होणार आहे. तसेच उस्फूर्त प्रतिसाद महायुतीला मिळत आहे आणि कल्याण लोकसभेची जागा विक्रमी मताने जिंकून येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com