

Raj Thackeray Documentary
esakal
Raj Thackeray Latest News : गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री सोशल मीडियावरून हटवणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अदानी समूहाच्या कथित एकाधिकारशाहीविरोधातील लढा सुरूच राहणार असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापवले आहे.