

Raj Thackeray Targets Adani Growth With Video At Rally
Esakal
शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत राज ठाकरे यांनी सुरुवातीला भाषण करत पुन्हा एकदा त्यांच्या स्टाइलने लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यापासून देशात अदानी उद्योग समुह कसा आणि किती वाढला हेच त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं आणि गुजरातला जोडण्याचं षडयंत्र कसं राबवलं जातंय यावरूनही राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. अदानींबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आज मी जे इथं दाखवणार आहे ते पाहून तुम्हाला भिती वाटली नाही तर निवडणूक न लढवलेलं बरे.