Raj Thackeray Garjana Morcha Mumbai against Election Commission and Gyanesh Kumar
esakal
मुंबई : “आजचा मोर्चा कशासाठी आहे, हे सर्वांना माहिती आहे. मी २०१७-१८ पासून मतचोरीचा मुद्दा मांडत आलोय. त्यावेळी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन मतदान यंत्रे, मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिकाही मी त्यावेळी मांडली होती. त्या वेळी मी काय सांगत होतो, हे आता सर्वांना समजू लागले आहे,” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.