esakal | राज्यपालांना पत्र पाठवून राज ठाकरेंनी केली 'ही' खास मागणी....
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांना पत्र पाठवून राज ठाकरेंनी केली 'ही' खास मागणी....

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती राज्यात दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. राज्य सरकारसह अनेक राजकीय पक्ष कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी मदत करत आहेत.

राज्यपालांना पत्र पाठवून राज ठाकरेंनी केली 'ही' खास मागणी....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती राज्यात दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. राज्य सरकारसह अनेक राजकीय पक्ष कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी मदत करत आहेत. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी राज ठाकरेंनी राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंनी राज्यपालांना पहिल्यांदाच हे मागणीचं पत्र पाठवलं आहे. 

राज्य सरकारने विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास नकार दिला. मात्र राज्यपालांनी यावर नाराजी व्यक्त करत परीक्षा घेण्याचा आग्रह केला आहे. दरम्यान या वादात आता मनसेनं उडी घेतली आहे. राज्यपालांना पाठवलेलं पत्र राज ठाकरे यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

मोठी बातमी - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का ? संजय राऊत म्हणतात...

आपण राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आहात, असं म्हणत मे महिना संपत आला तरी राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय झाला नाही आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे मला विद्यापीठांचे कुलपती नात्यानं तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती भयंकर

राज्यात कोरोनाची परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आलं आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे अजून किती काळ लॉकडाऊन राहील याचं भाकीत कोणीच करु शकत नाही. हे सांगणंही कठीण आहे. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कुणासाठी?' असा सवालही राज ठाकरेंनी आपल्या पत्रात उपस्थितीत केला आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव किती जबरदस्त आहे हे तुम्ही देखील जाणता असं मी मानतो. मग इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांचे आरोग्य धोक्यात घालण्यामागे नक्की प्रयोजन काय? दोन महिन्याचा लॉकडाऊन देशाने सहन केला. जीव वाचला तर पुढे सगळे शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हरकत काय आहे? असा थेट विचारणाही राज यांनी राज्यपालांना केली आहे. 

मोठी बातमी - राजकीय हालचाली पाहता काँग्रेसचा 'हा' बडा नेता म्हणतोय, "आता काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं"

पुढे राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं की, बरं परीक्षा रद्द करणे म्हणजे ससरकट विद्यार्थ्यांना पास करणं असा होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयांना घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारावर किंवा त्यांना काही प्रोजेक्ट्स देऊन किंवा इतर अनेक पद्धतीने अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करता येणं शक्य आहे. मला खात्री आहे अनेक शिक्षणतज्ञांनी या विषयावर मार्ग तुम्हाला सुचवले असतील. पण जर ते नसतील तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना याविषयी नक्की मार्गदर्शन करेल. 

आज मुंबई विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी हे अनेक किलोमीटर प्रवास करुन त्यांच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचतात. सध्याच्या परिस्थितीत अशा हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणं सुद्धा शक्य होणार नाही. आज कोरोनामुळे अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं असून किमान त्यात परीक्षा लांबणीवर पडण्याची टांगती तलवार तरी त्यांच्या डोक्यावर नको, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

मोठी बातमी - संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, महाराष्ट्रातील सरकारबाबत केलं 'मोठं' भाष्य...

निव्वळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आणि अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात आणि यात कुठल्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये, अशी विनंतीही राज ठाकरेंनी राज्यपालांना केली आहे.

raj thackeray writes a letter to governor bhagatsingh kosjhyari and asked to cancel TY exams