मुंबई महापालिकेतील गुप्ता कोण आहे ? मनसे म्हणतेय...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

कोविड बाधित मृतदेह ठेवण्याच्या बॉडीबॅगच्या राजकरणात मनसेने उडी घेतली आहे.मराठी कंपनीच्या उच्च दर्जाच्या बॉडीबॅग्ज पालिकेने विकत घेऊ नये म्हणून अमराठी लॉबी काम करत असून याबाबत तटस्थ चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : कोविड बाधित मृतदेह ठेवण्याच्या बॉडीबॅगच्या राजकरणात मनसेने उडी घेतली आहे.मराठी कंपनीच्या उच्च दर्जाच्या बॉडीबॅग्ज पालिकेने विकत घेऊ नये म्हणून अमराठी लॉबी काम करत असून याबाबत तटस्थ चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कोविड बाधित मृतदेह ठेवण्यासाठी लिकप्रुफ बॉडीबॅगची गरज असते. महापालिकेने औरंगाबाद येथील वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीकडून काही बॉडी बॅग खरेदी केली. या कंपनीची  केंद्र सरकारच्या संकेत स्थळावर नोंदणी असून त्यांचा दरही प्रसिध्द करण्यात आला आहे. मे महिन्यात पालिकेने 20 हजार बॉडीबॅग्ज खरेदीसाठी निवीदा मागवल्या.

सरासरी गुणांनी अकरावीच्या शेकडो विद्यार्थ्यांचा केला घात; दहावीत गुणवंत, अकरावीत नापास

त्यात ही कंपनी पात्र ठरली होती. यासाठी कंपनीने बॉडीबॅग्जचा दरही 1 हजार रुपयांनी कमी करुन 6718 रुपयांत सर्व करांसह देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कंपनीचे मालक सतीश कल्याणकर याच काळात पालिका मुख्यालयात आले. तेथे त्यांची एका व्यक्तीने भेट घेऊन गुप्ता नावाच्या व्यक्तीशी फोनवर बोलणं करुन दिलं. त्यात 15 टक्केे कमिशन या व्यक्तीने मागितले. मात्र, कल्याणकर यांनी हे कमिशन देण्यास नकार दिला. त्या घटनेनंतर या बॉडी बॅगच्या किंमतीवरुन वाद निर्माण झाला. नंतर ही निवीदा प्रक्रीया रद्द केली.

या प्रकरणात आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रारही या कंपनीने दाखल केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी आज कल्याणकर यांच्या सोबत पत्रकार परीषद घेऊन याबाबत माहिती दिली.

महापालिकेत अमराठी कंत्राटदारांची लॉबी असून त्यांना राजकिय बरदहस्तही आहे. त्यामुळे येथे मराठी कंत्राटदाराला प्रवेश मिळून दिला जात नाही. मराठी कंत्राटदारांनी प्रयत्न जरी केला तरी ही लॉबी सर्व बाजूने मराठी उद्योजकांची कोंडी करते. या प्रकरणात तटस्थ चौकशी करण्याची मागणीही देशपांडे यांनी केली. अन्यथा मनसेच्या पध्दतीने भ्रष्ट अधिकार्यांचा समाचार घेऊ असेही देशपांडे यांनी नमुद केले.

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात? जाणून घ्या नेमकं प्रकरण...

पालिकेत गुप्ता कोण ? 

कल्याणकर यांच्याकडे गुप्ता नावाच्या व्यक्तीने त्यांच्या कंपनीची फ्रँचायझी अथवा 15 टक्के कमिशन मागितले होते. या बॉडीबॅग्जची खरेदी पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणा मार्फत केली जाते. जर फ्रेंचायजी दिली नाही तर पालिकेत काम करुन देणार नाही अशी धमकीही या व्यक्तीने दिली होती. त्यामुळे पालिकेतील गुप्ता कोण असाा प्रश्न आता उपस्थीत होत आहे. देशपांडे यांनी एका विरोधी पक्षातील राजकीय पक्षाशी ही व्यक्ती संबंधित असल्याचा दावाा केला आहे.

देशपांडे यांनी यावेळी कोविड केंद्राच्या उभारणीतही भ्रष्टाराचा आरोप केला. मैदानात उभारलेल्या कोविड केंद्रांमध्ये सर्व वस्तू भाड्याने घेण्यात आल्या आहेत. या भाड्याच्या किंमतीत या वस्तू विकत घेता आल्या असत्या. असा आरोपही त्यांनी केला. या सर्व भ्रष्टाचारा मागे एक गॅंग कार्यरत आहे. त्याचीही चौकशी करावी अशी मागणीही देशपांडे यांनी केली. 

raj thackerays MNS party blams BMC for doing corruption in buying body bags


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackerays MNS party blams BMC for doing corruption in buying body bags