Thackeray brothers alliance, Shiv Sena UBT MNS alliance
esakal
Raj-Uddhav Thackeray Brothers Alliance Finalised : राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली असून आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबतच आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली.