
Rajan Vichare
ESakal
ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदारांच्या यादीत बोगस (खोटी) नावे टाकण्याचा प्रयत्न झाल्यास, संबंधित अधिकाऱ्यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत दिला.