Raju Patil: दिव्यात जागावाटपावर हालचाली! नाराज भाजप इच्छुक मनसेच्या संपर्कात, राजू पाटील यांचा दावा

Kalyan-Dombivli Municipal Election: कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या जागावाटप आणि उमेदवारीबाबत भाजपमधील अनेक होतकरू इच्छुक नाराज झाले आहेत. यामुळे ते मनसेच्या संपर्कात असल्याचा दावा राजू पाटील यांनी केला.
Raju Patil On KDMC Election

Raju Patil On KDMC Election

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा आणि 14 गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, मनसेकडून जागावाटप आणि उमेदवारीबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी दिव्यात तीन पॅनलमधून 5 जागा मागितल्याचे सांगत, त्यापैकी एक-दोन जागांवर आमचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. काही जागांवर शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक असल्याने त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमधील अनेक होतकरू इच्छुक नाराज झाले असून ते मनसेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com