

Raksha Bandhan Special BEST Bus
ESakal
मुंबई : रक्षाबंधन सणानिमित्त शुक्रवारी (ता. २८) मुंबई शहर आणि उपनगरात प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी विविध मार्गावर १३६ जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय 'बेस्ट' प्रशासनाने घेतला आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून ही सेवा दिवसभर सुरू राहणार आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या बस थांब्यांवर बस निरीक्षक, वाहतूक अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.