मुंबई - खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून मागितली खंडणी; एकाला अटक

या घटनेमुळे अनेक हॉटेल मालकांचे धाबे दणाणले आहेत.
crime
crime sakal
Summary

या घटनेमुळे अनेक हॉटेल मालकांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई - मुंबईतील कुलाबा परिसरात खेळण्यातल्या बंदुकीने हॉटेल मालकाकडे खंडणी (ransom) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबल माजली आहे. यामुळे अनेक हॉटेल मालकांचे धाबे दणाणले आहेत. या घटनेसंदर्भात सिल्वारज पल्ली असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

crime
रावसाहेब दानवेंनी वडा पाव खाल्ला, पैसे दिले की नाही? बिलाच्या पावतीचा फोटो Viral

घडलेली घटना अशी, सिल्वाराज हा याआधीही तक्रारदार यांच्या हॉटेलमध्ये खंडणी मागत होता. खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागतून त्याने तक्रारदाराला मारहाण करून सोबत असलेली नकली पिस्तुल आरोपीच्या डोक्याला लावून धमकी दिली आहे. (Mumbai Police) पैसे दिले नाहीत तर इथेच संपवेन अशी धमकी दिल्याने तो व्यावयसायिक घाबरला. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पिल्ली याला अटक करण्यात आली आहे. याआधीही पल्लीवर या आरोपीवर १८ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यात त्याच्यावर हद्दपारची कारवाईही करण्यात आली होती. दरम्यान, या गुन्ह्याचा अधिक तपास कुलाबा पोलिस करत आहेत.

crime
झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा; शिवनेरीवर शिवजन्म सोहळा उत्साहात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com