
50 टक्के कोरोनाबाधित पोलिस हे कंटेन्मेंट झोन परिसरात कर्तव्याला अथवा त्यांचे कार्यालय त्या परिसरात होते.
मुंबई : मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवस-रात्र प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत. हे प्रयत्न करताना अत्यावश्यक सेवेतील खास करून नागरिकांच्या वारंवार संपर्कात आलेल्या पोलिसांमध्ये कोरोना पसरण्याचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. पोलिसांमधील कोरोनाचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आता मुंबई पोलिस दलातील 94 पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या 45 ते 55 वयोगटातील पोलिसांची ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’ केली जाणार आहे.
देशभरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. पण करोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल येण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नव्हते. काही वेळा चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचे निधन झाल्याचे प्रकार घडले आहेत. ते टाळण्यासाठी ‘इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने काही दिवसांपूर्वी रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्टला मंजुरी दिली. या चाचणीमुळे आता जलदगतीने करोना चाचणीचा रिपोर्ट मिळणे शक्य होत असून रुग्णाला वेळीच उपचारही मिळणार आहे.
मोठी बातमी - महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक; तर 'या' वयोगटातील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण जास्त...
महाराष्ट्र पोलिस दलात आज 1773 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यात 204 अधिकारी आणि 1569 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राज्यात 90 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वेळीत या संसर्गाला आवरले नाही. तर परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणूनच मुंबई पोलिस दलात 24 जुलै ते 29 जुलै या कालावधीत मुंबई प्रादेशिक विभागातील परिमंडळानुसार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’ची टेस्ट केली जाणार आहे.
फक्त 45 ते 55 वयोगटातील पोलिसांची टेस्ट केली जाणार
या संपूर्ण प्रक्रियेत विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त यांची भूमिका ही संपर्क अधिकारी म्हणून महत्वाची राहणार आहे. वेळापत्रकानुसार विभागातील एकापोलिस ठाण्याच्या ठिकाणी हे शिबीर आयोजित केले जाणार आहे. या शिबीरात फक्त 45 ते 55 वयोगटातील पोलिसांची टेस्ट केली जाणार असून त्यात कुणी पाँझिटिव्ह आढळला. तर त्याला तातडीने पालिका किंवा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी किंवा क्वारनटाइंन सेंटरमध्ये हलवले जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चाचणी करून घेण्याचे काम हे संबधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर सोपवण्यात आले आहे.
मोठी बातमी - भाऊचा धक्का, एक सुनसान बोट आणि बोटीतील 'तो' खजाना; मग पोलिसांना आला संशय आणि...
मुंबई पोलिस दलात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्या मागे नेमके कोणते कारण आहे. त्याचा अभ्यास करून एक अहवाल बनवण्यात आला
काय आहे अहवालात :
मोठी बातमी - ती करत होती कोरोनासाठीच्या औषधांचं ब्लॅक मार्केटिंग, पोलिसांना समजलं आणि गेम ओव्हर...
रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्ट म्हणजे काय?
या टेस्टमध्ये रुग्णाच्या नाकातून नमुने घेऊन अँटिजेन शोधण्यात येतात. अँटिजेन म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मिसळलेला शरीरा बाहेरचा पदार्थ. रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्टमुळे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहे की, नाही ते अर्ध्या तासात समजते.त्यामुळे पोलिसांना तात्काळ उपचार देणे शक्य होईल.
( संपादन - सुमित बागुल )
rapid antigen testings of covid yoddha police force will be done in mumbai