Rapido Bike Driver Assault Attempt in Kalyan
esakal
Kalyan Crime News: रॅपिडो बाइक चालकाने तरुणीला निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार आणि लुटपाट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी बाईक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्याण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर आता अॅपआधारित बाइक टॅक्सी सेवांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.