esakal | श्रावण महिन्यात बटाटा महागला; लसणाचे भावही चढेच, कांदा मात्र स्थिर....
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावण महिन्यात बटाटा महागला; लसणाचे भावही चढेच, कांदा मात्र स्थिर....

सध्या मुंबईतील घाऊक बाजारात बटाटा 17 ते 25 रुपये किलोने विकला जात आहे. हाच भाव हिवाळा संपेपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

श्रावण महिन्यात बटाटा महागला; लसणाचे भावही चढेच, कांदा मात्र स्थिर....

sakal_logo
By
संजय घारपुरे

मुंबई : किरकोळ बाजारातील भाज्याच्या दरांवरून गृहिणींचे बजेट ठरले जाते. अनेकदा भाज्यांचे दर वधारले की सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते. त्यातही कांद्याचे भाव वाढले की त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होते. सध्या मुंबई परिसरातील बाजारात कांद्याचे भाव स्थिर आहेत. मात्र, श्रावण महिना सुरु झाल्याने बटाट्याची मागणी वाढल्याने बटाट्याचे भाव वाढले आहे. 

झोपडपट्टीमधील 57 टक्के नागरिकांना कोविडची बाधा, मात्र औषधाविना केली आजारावर मात

सध्या मुंबईतील घाऊक बाजारात बटाटा 17 ते 25 रुपये किलोने विकला जात आहे. हाच भाव हिवाळा संपेपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. सध्याच्या परिस्थितीत बटाट्याचे भाव कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. बटाट्याचे नवे पीक बाजारात मध्ये येईपर्यंत भाव हाच राहिल, असा त्यांचा कयास आहे. 

ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेनं राबवली 'ही' जबरदस्त उपाययोजना

बटाट्याला चढा भाव येत असताना कांद्याचा भाव मात्र आवाक्यात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सध्या मोठ्या प्रमाणावर कांदा आहे, त्यामुळे दोन महिने तरी कांद्याचे भाव वाढणार आहे. सध्या तरी घाऊक बाजारात केवळ महाराष्ट्रातीलच कांदा येत आहे. कांदा आवाक्यात असला तरी लसूण खूपच महाग आहे. काही महिन्यांपासून त्यात वाढ होत आहे. सध्या केवळ मध्य प्रदेश आणि राजस्थानातूनच लसूण येत आहे आणि ती येण्याचे प्रमाणही खूप कमी आहे. 

सोसायटीत चक्कर मारताना कशाला हवा मास्क ? आधी ही बातमी वाचा, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका...

सध्या श्रावण असल्यामुळे उपास होत आहे, त्यावेळी बटाटा महत्त्वाचा असतो. मात्र त्याचा साठा मोठ्या प्रमाणावर नाही, त्यामुळे त्याचे भाव जास्त आहे. हंगाम सुरु होतानाही उत्तर प्रदेशात बटाट्यांचा साठा केवळ 60 टक्केच होता. जून-जुलै महिन्यात त्यातील वीस टक्के माल विक्रीस आला. आता उर्वरीत चाळीस टक्क्यापैकी 15 टक्के बटाट्याचे नवे पीक घेण्यासाठी वापरला जाणार आहे. उर्वरीत 25 टक्केच नवे उत्पादन येईपर्यंत विक्रीस येणार आहे.
-----
संपादन ः ऋषिराज तायडे