

Ratnaprabha Mhatre Criticism on Sachin Pote
ESakal
डोंबिवली : कल्याण–डोंबिवलीत पक्षवाढीसाठी सचिन पोटे यांनी कधीही ठोस काम केले नाही. युवकांना पुढे येऊ दिले नाही आणि आता शिवसेनेत गेल्यानंतर काँग्रेसवर आरोप करत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे यांनी केला. कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसचे नुकसान होण्यास पोटेच जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.