Ravindra Chavansakal
मुंबई
हुतात्म्यांवर गोळीबार काँग्रेसने केलाय, मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी इतिहास तपासावा, रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल
Ravindra Chavan: महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावर टीका केली आहे. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी इतिहास तपासावा, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी जे रक्त सांडले, त्या आंदोलनावर गोळ्या झाडण्याचं पाप काँग्रेसचं आहे, हे इतिहासात नोंदलेलं सत्य आहे. सत्तर वर्षांपूर्वी १६ जानेवारी १९५६ रोजी नेहरूंनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली होती. त्या घटनेतून प्रेरित होऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ही ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी’ केली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

