
Ravindra Chavan
ESakal
दिवा : आगामी पालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वात अधिक ताकदवान पक्ष बणण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध भाजप अशी रस्सीखेचं सुरु झाली आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकीय खेळी सुरु असतानाच अंबरनाथ मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांना भाजपात प्रवेश करून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.