Ravindra Waikar: उत्तर पश्चिम मतदारसंघातील खासदार रवींद्र वायकर यांची खासदारकी जाणार की राहणार याचा फैसला झाला असून मुंबई हायकोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे. यासंदर्भात अमोल किर्तीकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. .Kurla Accident: कुर्ला बस अपघातातील अत्यंत लाजीरवाणी घटना! मृत महिलेच्या हातातील बांगड्या ओरबाडल्याचा व्हिडिओ व्हायरल.रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. तर त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून अमोल किर्तीकर होते. या दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत सुरु होती. एकवेळ अमोल किर्तीकर विजयी झाल्याची बातमी माध्यमांनी लावली. पण अचानक रवींद्र वायकर हे खूपच कमी मतांनी आघाडीवर आल्याचं दिसून आलं. अखेर वायकर हे अवघ्या ४८ मतांनी निवडून आल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं..Pune-Khadki Cantonment: पुणे, खडकी कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीन होणार? PMCनं उचललं महत्वाचं पाऊल .पण यावेळी मतमोजणीत घोळ असल्याचा आरोप अमोल किर्तीकर यांनी केला होता. यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत मतमोजणीत घोळ केल्यानं विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांना अपात्र करावे अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी पूर्ण झाली आणि हायकोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला. त्यामुळं आता हायकोर्टाचा निकाल काय येतो याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.