मुंबई विद्यापीठात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाला मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai university

मुंबई विद्यापीठात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाला मान्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशातील विविध क्षेत्रांतील संशोधन आणि त्यासोबतच उद्योग, व्यवसायाची गरज लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने पुढील शैक्षणिक वर्षात अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत यासाठीचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

विद्यापीठात प्रगत संशोधन आणि अभ्यासासाठी लवकरच ‘एमयु एक्सलेटर सेंटर’ची स्थापना केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून अत्यंत प्राचीन संस्कृती, मानवनिर्मित साहित्य, पुरातन काळातील अनेक बाबींबरोबरच बायोमेडिकल आणि अणुऊर्जेच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली जाणार आहे. भूगर्भशास्त्र, वनस्पती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राबरोबरच इतिहासावर देशातील विविध भागांमध्ये परिणामकारक अभ्यासासाठी आणि शास्त्रोक्त संशोधनासाठी या केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या केंद्राच्या सुविधेचा लाभ फक्त मुंबई विद्यापीठापुरताच मर्यादित न ठेवता या सुविधेचा लाभ सर्व विद्यार्थी, संशोधक आणि शास्त्रज्ञांना उपलब्ध होऊ शकेल. याचे नियोजन विद्यापीठामार्फत केले जाणार असल्याची माहितीही विद्यापीठाकडून देण्यात आली.

हेही वाचा: कास पठारावरील पुरावा नष्ट करण्यात अज्ञात अखेर यशस्वी; शोध लागणार का?

संशोधनासाठी प्रोत्साहन
विद्या परिषदेने दिलेल्या मान्यतेनुसार विद्यापीठात संशोधनासाठी अनेक दालने उपलब्ध हेाणार आहेत. यात सेंटर फॉर एक्सलेंस इन बेसिक सायन्स, सेंटर फॉर एक्सलेंस इन थेअरॉटिकल अँड कम्प्युटेशनल सायन्सेस, एनर्जी स्टडीज, मॅरिटाईम स्टडीज, स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स अँड स्ट्रॅटजिक स्टडीज, सेंटर फॉर हिंदू फिलॉसॉफिकल स्टडीज, सेंटर ऑफ एक्सलेंस इन स्पोर्ट्स सायन्स अँड स्पोर्ट्स मॅनेजमेट, एक्सट्रा म्यूरल स्टडीज, प्रो. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंन्ट अँड युथ मुव्हमेंट, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर अशा केंद्रामार्फत संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

loading image
go to top