

Virar Railway Station Expansion
ESakal
Virar Station Redevelopment : विरारच्या वाढत्या लोकसंख्येमुळे, स्थानकावरील प्रवाशांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी येथे मोठी गर्दी दिसून येते. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन, विरार स्थानकाचा पुनर्विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) द्वारे MUTP-III अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात प्रवाशांच्या सोयीसाठी डेक, एस्केलेटर आणि लिफ्टसारख्या आधुनिक सुविधा विकसित केल्या जात आहेत.