...अन्यथा मला भारत-चीन सीमेवर लढायला पाठवा; एसटी चालकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

संजय घारपुरे
मंगळवार, 14 जुलै 2020

राज्यातील एसटीची सेवा नियमीत सुरु नसल्याने महामंडळाचे दिवसाला 23 कोटींचे नुकसान होत आहे. उत्पन्न नसल्याने पगार वाटप करण्याच अडचणी येत आहेत. सरकारने साह्य केल्यामुळे बृहन्मुंबईवगळता मार्चचा 75 टक्के पगार एप्रिलमध्ये देणे शक्य झाले.

मुंबई : माझा मार्च महिन्यापासून थकित असलेला पगार द्या, नाहीतर मला लढायला भारत चीन सीमेवर पाठवा असे पत्र एसटीमधील बसचालकाने मुख्यमंत्री कार्यालयास लिहिले असल्याचे वृत्त आहे. माझी आई खूप दिवसांपासून आजारी आहे. आता आमच्याकडे खायलाही काही नाही असेही त्याने पत्रात म्हटले आहे.  

लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने आखली 'ही' योजना

नालासोपारा येथे राहणारे, पण मुंबई सेंट्रल आगारात काम एसटी चालक आनंद मनोहर हेळगावकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांनी आपण 1999 पासून एसटीच्या सेवेत आहोत. गेल्या काही आठवड्यापासून आपली प्रकृती ठीक नाही आहे. आई आजारी आहे. आपल्याला नियमित वेतन नाही. त्यामुळे अक्षरशः उपाशी रहावे लागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याप्रकाराबाबत एसटीचे पदाधिकारी याबाबत चौकशी करीत आहेत. 

चिंताजनक! राज्यातील युवाशक्तीच कोरोनाच्या सावटात; तब्बल 'इतक्या' हजारांहून अधिक तरुणाईला बाधा...

हेळगावकर यांचा दूरध्वनी बंद आहे, पण राज्य परिवहन कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी बृहन्मुंबई क्षेत्रात एसटी कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळत नसल्याचे सांगितले. त्यांनी एसटीसाठी राज्य सरकारने दोन हजार कोटींचे साह्य करावे अशीही सूचना केली. लॉकडाऊन कालावधीतही आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटीने आपली सेवा उपलब्ध करुन दिली होती. त्यासाठी कर्मचारी अहोरात्र काम करीत होते, तरी त्यांना योग्य वागणूक दिली जात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

ऐन लॉकडाऊनमध्ये सिडकोने उगारला कारवाईचा बडगा; आमदार म्हात्रेंनी केली कारवाई थांबवण्याची मागणी...

राज्यातील एसटीची सेवा नियमीत सुरु नसल्याने महामंडळाचे दिवसाला 23 कोटींचे नुकसान होत आहे. उत्पन्न नसल्याने पगार वाटप करण्याच अडचणी येत आहेत. सरकारने साह्य केल्यामुळे बृहन्मुंबईवगळता मार्चचा 75 टक्के पगार एप्रिलमध्ये देणे शक्य झाले. एप्रिलचा शंभर टक्के पगार मे महिन्यात देण्यात आला. मात्र मे महिन्याचे पन्नास टक्केच वेतन जूनमध्ये देण्यात आले.  आता थकित पगार तसेच जूनचे वेतन वेळेवर देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री, परिवहनमंत्री तसेच शरद पवार यांनाही पत्र लिहिले आहे. त्यात दोन हजार कोटींचे साह्य करण्याची विनंती केली आहे. 
----

संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: otherwise send me on indo-china border, st driver writes letter to sm uddhav thackeray