रिक्षा थांब्यांचे लवकरच पुनर्सर्वेक्षण

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

थांब्यांअभावी व्यवसायावर परिणाम; चालकांमध्ये नाराजी 

पनवेल : खुल्या परवाना धोरणामुळे रिक्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत पूर्वी आखून देण्यात आलेले रिक्षा थांबे कमी पडू लागले असून, थांब्यांअभावी रिक्षाचालकांची होणारी कुचंबना थांबवण्याच्या हेतूने नव्याने रिक्षाधोरण आखून पर्यायी थांबे देण्यात येणार आहेत. रिक्षा थांब्यांचे पुनर्सर्वेक्षण करून रिक्षा थांब्यांबाबत धोरण ठरवण्यासाठी शनिवारी (ता. १५) पालिकेत सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने पालिका सभागृहात बैठक पार पडली.

हे पण वाचा ः रंगला असा पालखी सोहळा

या वेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, विकास घरत, पोलिस निरीक्षक अभिजित मोहिते, आरटीओचे अधिकारी किरण खोत, शहर अभियंता संजय कटेकर तसेच रिक्षाचालकांच्या वंदे मातरम संघटनेचे रवी नाईक उपस्थित होते. 

हे पण वाचा ः कोणी सावली देईल का?

शासनाच्या खुल्या परवाना धोरणामुळे पनवेलमध्ये रिक्षांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रिक्षाच्या वाढलेल्या संख्येमुळे प्रादेशिक परिवहन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले रिक्षा थांबे कमी पडू लागले आहेत. परिणामी, पालिका हद्दीत नव्याने रिक्षा थांबे उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

रिक्षा थांब्यांची गरज लक्षात घेत पालिका हद्दीत सर्वेक्षण करून नव्याने रिक्षा थांबे उभारण्याकरिता सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्‍त विद्यमाने समिती स्थापन करून कार्यवाही करण्याचे संकेत बैठकीदरम्यान देण्यात आले. 

वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि नव्याने रिक्षा थांबे उपलब्ध व्हावेत, या हेतूने शनिवारी बोलवण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात 
आली आहे.
- अभिजित मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, पनवेल 

वाढत्या रिक्षांच्या संख्येमुळे थांबे कमी पडू लागले आहेत. नव्याने रिक्षा थांबे उपलब्ध करता यावे, या हेतूने शनिवारी बोलवण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
- संजय काटेकर, अधिकारी, बांधकाम विभाग, पनवेल पालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation of rickshaw stops soon